भगवान महावीर जयंती गुरुवारी तळेगावात उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री. भगवान महावीर दिगंबर जैन मंडळातर्फे स्वप्न नगरीत भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळे, उपाध्यक्ष प्रकाश चिवटे, सचिव जीनचंद्र पलसे आणि प्रा. प्रदीप फलटणे यांच्यासह जैन कुटुंबातील महिला, युवक, युवती आणि आबाल वृद्ध भक्तिभावाने सहभागी झाले होते. मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील जैन कुटुंबीयांनी मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ढोल-ताशाच्या पथकाने लयबद्ध वादन करत त्यात रंगत आणली. दुपारी आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्तीतीत जैन समाजचा मेळावा आयोजित केला होता.
यावेळी 'भारतीय जैन समाज आणि ओबीसी' या विषयावर प्रा. फलटणे यांनी विचार मांडले. महावीर जयंती निमित्त समाजाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.