featured

प. पू. आचार्य श्री. १०८ दयासागरजी महाराजांचे तळेगाव नगरीत जल्लोषात स्वागत

७:४३ PMUnknown



          समस्त दिगंबर जैन भाविकांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, दि. २५ मार्च २०१७ रोजी प. पू. आचार्य श्री. १०८ दयासागरजी महाराज यांचा तळेगाव नगरीत मंगल प्रवेश झाला आहे. मुनिजींचे सर्व जमा झालेल्या भाविकांनी जाल्लोष्यात स्वागत केले.

          मुनिजींचा विहार महावीर जयंती निमित्त मुंबई कडे होणार आहे. त्या दृष्टीने, आपल्या मंडळातील काही सदस्यांनी मुनींना आगोदरच जाताना तळेगाव मध्ये येण्याचे आमंत्रित केले होते. आपले आमंत्रण स्वीकारून मुनि काल दि. २५ मार्च रोजी तळेगावात आले. त्यांच्या नियोजनाप्रमाणे मुनिजींचा तळेगावात दि. २५ मार्च रोजी मुक्काम असेल व दि. २६ मार्च रोजी सकाळी लवकर दिगंबर जैन समाजाला उद्देशून प्रवचन देतील व नंतर त्याचा विहार सुरु होईल.


          मुनिजींना आमंत्रित करण्याचा मुख्य उद्देश हा होता की त्यांच्या उद्देशाने आपल्याला व तळेगावातील इतर दिगंबर जैन समाजाला तळेगाव नगरीत दिगंबर जैन मंदिर उभं करण्याची प्रेरणा मिळेल.

          महाराजांनी त्यांच्या प्रवचनात णमोकार मंत्राचे व नगरात जिनमंदिर असण्याचे महात्म्य सांगून खूप महत्वाचे मुद्दे मांडले ते खालीलप्रमाणे.

१. आगोदर मंदिरासाठी जागा मिळविणे
          महाराजांनी सांगितले की, जागा मिळविण्यासाठी आपण स्वताः अगोदर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुमचे स्वतःचे जागेच्या रूपात अस्तित्व असल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे कोणीही देणगी देताना विचार करेल. तर त्या दृष्टीने आपले प्रयत्न असले पाहिजेत.

२. शिलान्यास करून मूर्ती स्थापन करणे
          महाराज पुढे म्हणाले की, एकदा का जागा मिळाली की पुढे मंदिर निर्माण करण्यासाठीचा निधी गोळा करणे सोपे जाईल. आपल्या समाजात अशे खूप दातार आहेत ज्यांच्या मदतीने तुमचे कार्य सोपे होईल. तुमच्याकडे मंदिरासाठी जागा उपलब्ध असल्यावर अशा दातारांची मंदिर निर्माणासाठी देणगी देण्याची भावना आपोआप तयार होईल.
           शिखरबंद मंदिर निर्माण करण्यासाठी बराच काळ लागेल, त्यापेक्षा, अगोदर जागेवर भव्य मूर्ती स्थापन करून, मग हळू हळू मुनी निवास, मंदिर, शिखर, फरशी, धर्मशाळा अशा गोष्टी आपोआप घडतील.

३. जीनालायाचे महात्म्य
          महाराजांनी जिनालाय असण्याचे महत्व पटवून देताना साप व चंदनाच्या झाडाचे उदाहरण दिले. ज्या प्रमाणे मोराच्या आवाजाने चंदनाच्या झाडाला गुंडाळून बसलेला साप आपोआप त्याच्या  बिळात निघून जातो; त्या प्रमाणे ओम जय जय जय निस्सहि निस्सहि निस्सहि करत मंदिर प्रवेश केल्यामुळे सर्व पाप दूर होऊन पुण्याचा उदय होतो.
          आपण घरी देवाची पूजा करताना आपल्याकडून ती व्यवस्था, शुद्धता आणि पावित्र्य पळाले जात नाही जे मंदिरात पळाले जाते. त्यामुळे नगरात जिन मंदिर असणे आवश्यक आहे.

४. प्रेरणा
          महाराजांनी सर्व जैन भक्तांना प्रेरणा देत सांगितले की, जर तुमची खरोखरच भावना असेल तर तुम्ही तुमच्या शक्ती, सामर्थ्य आणि पुण्या च्या जोरावर शिलाण्यास करून २ महिन्यात मंदिर उभे कराल.

५. सहयोग
          महाराज म्हणाले की, ह्या पुण्य कार्यास तुमचा सर्वांच सहयोग असणे आवश्यक आहे.
          ज्या प्रमाणे विहिरीतून पाणी काढल्यावर, काही वेळाने आपोआप पाणी परत येते, त्या प्रमाणे, तुम्ही दान केलेली राशी दुप्पटीने तुम्हाला परत मिळेल. म्हणून लेकीन, किंतु, परंतु मध्ये आपले भाव बांधू नका व महाराज हे आपले प्रेरणा श्रोत आहेत असे समजून सर्वांनी पुढे येऊन सढळ हाताने दान करा.

          महाराजांच्या प्रेरणेतून मंदिरासाठी जागा मिळविण्याच्या उद्देशाने काही दातारांनी स्वइच्छेने महाराजांसमोर आपापले दान घोषित केले व काही जनांनी दान म्हणून त्यांच्याकडून रोख रक्कम मंडळाच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केली.

दातारांची नावे खालीलप्रमाणे.

दाताराचे नांव             दान राशी
श्री. शांतीनाथ पाटील ११,०००
श्री. व सौ. लुन्गाडे साहेब १११०००
श्री. महावीर काळे ५५५५५
श्री. भाकरे १११०००
श्री. व सौ. जेगावकर १११०००
श्री. आकाश चिवटे ५५५५५
श्री. महावीर शेटे ५५०००
श्री. विकास कंधारकर ५५०००
श्री. दीपक साखरे १११०००
श्री. विद्याधर भूर्ज ५५५५५
श्री. व सौ. चानेकर १११०००
श्री. खवाटे ५१०००
श्री. महावीर कनमुसे १११०००
श्री. दत्ता शेटे ५५०००
शैला गाडे ५००१
श्री. रणदिवे (चिंचवड) ११०००
श्री. महावीर कासलीवाल ५०००
सुदाम गांधी ५०००
श्री. व सौ. सौदागर १११०००
श्री. दिलीप कटके ५५५५५
श्री. व सौ. दुरुगकर २५५२५

सर्व दातारांचे व दिगंबर जैन समाजाचे हे मंडळ खूप खूप आभारी आहे.

जय जिनेंद्र !!!

टीप: काही दातारांची नावे ह्या यादीत नसतीलही. मंडळाच्या अध्यक्षांकडे सर्व दातारांची यादी उपलब्ध आहे.

You Might Also Like

0 टिप्पणी(ण्या)

Popular Posts

संपर्क फॉर्म