पुण्य दानाचे आवाहन featured

समस्त दिगंबर जैन बंधू भगिनींना पुण्य दानाचे आवाहन

९:०४ AMUnknown



जय जिनेंद्र !!!

।। श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंडळ, तळेगांव दाभाडे, पुणे ।।

समस्त दिगंबर जैन बंधू भगिनींना पुण्य दानाचे आवाहन.

पुणे ते लोणावळा या जवळ-जवळ ६० किलोमीटर अंतरामध्ये तळेगांव दाभाडे या मध्यवर्ती मुनी, त्यागी यांचेसाठी विश्राम स्थान / मुनी निवास उभे करण्याचा मानस आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. हा मानस पूर्ण करणे हेतू समस्त जैन बांधवांनी सढळ हाताने मदत करावी. फुल ना फुलाची पाकळी आपली मदत हि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मनोबल, आत्मविश्वास वृद्धिंगत करून कार्य सिद्दी प्राप्त करण्यास गती देणार आहे. तरी सर्व दातारांचे शतशः आभार व धन्यवाद.

समस्त तळेगांव निवासी यांनी धार्मिक कार्याचा पाय १९८० साली श्रीमती चिवटे बाई यांच्या मार्गदर्शनाने घालण्यात आला. तेंव्हा पासून गेली अनेक वर्षे छोटे-मोठे धार्मिक कार्यक्रम राबवत आहोत. सध्या त्या पेरलेल्या रोपाची वाढ होत आहे. आज ५ ची ५० घरे व एकूण १५० जैन बांधवांचे वास्तव्य या तळेगांव दाभाडे या नगरीत आहे. सर्वांनी एकत्र येऊन या संस्थेच्या नोंदणीचे काम हाती घेतले आहे व पुढील २ ते ३ महिने त्यास मान्यता मिळेल.

प्रामुख्याने आणखी एक गोष्ट आम्हा सर्वांचे ध्यान आकर्षित करणारा प्रसंग म्हणजे विहारात त्यागींची होणारी गैरसोय. पुणे ते लोणावळा या सुमारे ६० किलोमीटर अंतरामध्ये मुनी विहारात एक मुक्काम अटळ आहे. पण आम्ही या प्रसंगास तोंड देण्यास असमर्थ आहोत कारण या ठिकाणी दिगंबर जैन मंदिर वा मुनी निवास याचा आभाव आहे.

या आभावावर मात करणेचे दृष्टिकोनातून आम्ही तळेगांव करांनी हे काम हाती घेण्याचे ठरविले. या कार्यात आपलाही हातभार लागावा व पुण्य संपादन करावे हि विनंती. आम्ही समस्त तळेगांव निवासी श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंडळ यांचेकडून आपले शतशः धन्यवाद.

You Might Also Like

0 टिप्पणी(ण्या)

Popular Posts

संपर्क फॉर्म